हडपसर : पुणे-सोलापुर महामार्गावरील हडपसर गाडीतल येथे भरधाव कंटेनरने चार रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता.२९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १ जण ठार तर ३ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापुर महामार्गावरून सिमेंटचा कंटेनरने भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चालला होते. कंटेनर हडपसर गाडीतळाजवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आला असता, एक दुचाकी सोलापूर रस्त्यावरून विरुद्ध दिशेने येत होते. तेव्हा कंटेनर चालकाने दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि प्रथम झाडाला धडक दिली. यात झाड उन्मळून खाली पडले.
त्यानंतर कंटेनरने रस्त्यावरून जात असलेल्या चार रिक्षांवर पडला. या अपघातात रिक्षांचा चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या रिक्षांमध्ये प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, हडपसर पोलीस व अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. या अपघातात कंटेनरच्या खाली सापडलेल्या प्रवास्यांना बाहेर काढण्यात येत आहे. तर या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हडपसर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सविस्तर वृत्त थोड्या वेळातच