छत्तीसगड : छत्तीसगड : छत्तीसगड येथील नारायणपूरच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते रतन दुबे यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दुबे यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या चार नक्षलवाद्यांना छत्तीसगड पोलिसांनी रविवारी 10 डिसेंबर रोजी अटक केली.
दरम्यान, छत्तीसगडच्या नारायणपूर येथे विधानसभा मतदारसंघासाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होतं. त्याआधीच 4 नोव्हेंबर रोजी नारायणपूर जिल्ह्यातील कौशलनगर येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. रतन दुबे हे भाजप जिल्हा उपाध्यक्षासहित एका वाहतूक संघटनेचेही जिल्हा उपाध्यक्ष होते. कौशलनगर बाजारात भाजपचा प्रचार करून परतताना नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भाजप नेत्याची हत्या झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत होते. नक्षलग्रस्त भागात भाजप नेत्यांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सांयकाळी साडे पाच वाजता रतन दुबे हे झारघाटी पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर दूर कौशलनगर गावात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्र्याच्या मदतीने दुबे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास सुरु असताना आज ११ डिसेंबरला चार नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
#WATCH | Chhattisgarh: Naxals involved in the murder of BJP leader Ratan Dubey in Naryanpur during an election campaign were arrested by Police, earlier today. pic.twitter.com/FYznxONPJA
— ANI (@ANI) December 10, 2023