पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घातक शास्त्रे जप्त केली आहेत.
अक्षय विक्रम आरडे (वय – १९, रा. गव्हाणे पेट्रोल पंपामागे शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी पुणे मुळ रा. घाटावडे, ता. केज, जि. बीड), अंत्रोस गोंदेलाल पवार (वय-४०, रा. गाव बेडाऊ, ता. छन्नेरा, जिल्हा खंडवा, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. पुणे फिरस्ता), आकीलाल साकीलाल पारधी (वय-२५, रा. ग्रामकुडो ता. रिठी. जि. कटनी, राज्य मध्य प्रदेश), वियरलाल मनीवेज राजपुत (वय-२५, रा. ग्राम कोहडे, ता. रिठी, जि. कटनी, राज्य मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ११) गुन्हे शाखा युनिट चारचे पथक गस्त घालीत असताना खडकी अॅग्युनेशन फैक्ट्रीकडुन विश्रांतवाडी कडे जाणा-या टैंक रोडचे कडेला एक संशयित रिक्षा उभी असलेली दिसून आली. रिक्षामधील इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने नक्कीच काहीतरी गडबड आहे असा दाट संशय पोलीस स्टाफला आल्याने रिक्षा व त्यामधील इसमांना ताब्यात घेतले व त्यांची नावे विचारता रिक्षा चालकाने त्याचे नाव अक्षय आरडे असे सांगितले. तर पाठीमागे बसलेल्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली.
त्यांची अंगझडती व रिक्षाची पाहणी केली असता आरोपीकडे लोखंडी कोयते, कु-हाडी, करवत ही घातक हत्यारे आणि कटावनी कटर, नायलॉन दोरी ही घरफोडीची साधने रिक्षात मिळून आली. त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्यातील अतुल चव्हाण व सुरज हे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीचे पोलीस कस्टडीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन दाखल गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाघव, गुन्हे शाखा युनिट ०४, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, नागेश सिंग कुंवर, प्रविण भालचीम, प्रविण कराळे, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, विनोद महाजन, कौस्तुभ जाधव, सारस साळवी, रमेश राठोड, अशोक शेलार, वैशाली माकडी, शितल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.