उरुळी कांचन (पुणे)- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक व युवा उद्योजक प्रतिक बाळासाहेब काळंगे (वय- 28, रा. उरुळी कांचन) यांनी त्यांच्या शेवाळवाडी य़ेथील आराध्या लॉज मधील एका खोलीतील पंख्याला गळफास लावुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. 24) सकाळी उघडकीस आला आहे.
प्रतिक काळंगे यांना दोन छोटी-छोटी मुले आहेच. एक मुलगा चार वर्षाचा तर एक मुलगा तीन महिण्याचा आहे. प्रतिक काळंगे एकटेच मंगळवारी रात्री शेवाळेवाडी येथील आराध्या लॉज मध्ये झोपण्यासाठी गेले होते. आज सकाळी लॉज चा कामगार प्रतीकला उठवण्यासाठी गेला असता, प्रतिक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आले.
प्रतिक काळंगे यांचा वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह हवेली तालुक्यात मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिग व्यवसाय होता. मात्र मागिल कांही महिण्यापासुन केवळ हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लावले होते. यामुळे प्रतिक काळंगे यांच्यावर आर्थिक ताण आल्याने, प्रतिक काळंगे गळफास लावुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
प्रतिक काळंगे यांचा मागिल सात ते आठ वर्षापासुन मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिग व्यवसाय चालु होता. त्यांचा उरुळी, कांचन, लोणी काळभोर, वाघोली, कुंजीरवाडीसह पुर्व हवेलीमधील अनेक गावात प्लॉटिग व्यवसाय चालु होता. मात्र मागिल वर्षभऱापासुन हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लादल्याने, त्यांच्या व्यवसाय बंद पडला होता. यामुळे ते आर्थिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. याच नैराश्यातुन आत्महत्या केली असावा असा कयास मित्र मंडळी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्याकडुन लावला जात आहे. प्रतिक काळंगे यांच्या घरातील नातेवाईकांनी मात्र त्यांच्या मृत्युते कारण अद्याप सांगितलेले नाही.
तुकडाबंदी कायद्याचा पहिला बळी?….
पुणे जिल्हात अकरा गुंठ्यांची खरेदी-विक्री जोरात चालु असतांना, हवेली तालुक्यात मात्र शासनाने तुकडाबंदी कायद्याचा बडगा दाखवत खरेदी-विक्रीचे दस्त करण्यावर बंदी घातली आहे. पुर्व हवेलीसह संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात मोठमोठ्या रकमा गुतंवलेल्या आहेत. दस्तबंदी केल्याने, प्ल़ॉटिंग व्यवसाय पुर्णपणे बंद झाला असुन, यात गुंतवणुक केलेले तरुण मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. प्रतिक काळंगे यांच्यावर आर्थिक ताण आल्यामुळे, त्यांनी खरोखरच आत्महत्या केलेली असेल तर, पुढील काळात तुकडा बंदी कायद्याबाबत शासनाने फेरविचार न केल्यास अनेक तरुणांना आत्यहत्येशिवय पर्यात उरणार नाही असे बोलले जात आहे.