Fire News | उरुळी कांचन, (पुणे) : पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरातील कै. वसंत धोंडिबा चौधरी व्यावसायिक संकुलातील गोडावूनला लागलेल्या भीषण आगीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचे साहित्य जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी (ता. २६) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी हायड्रॉलिक पाईप हायड्रॉलिक मशीन ,ओईल फर्निचर जनरेटर, व्ही बेल्ट काम्पुटर, बेलओ होस, कॅनव्हर बेल्ट होस बेल्ट आसा सर्व मुद्दे माल जाळून खाक झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात निखील रामदास चौधरी यांचे श्रीनाथ इंटरप्राइजेस नावाने गोडावून आहे. या गोडावून मध्ये हायड्रॉलिक पाईप, हायड्रॉलिक मशीन ऑईल, फर्निचर, जनरेटर, व्ही बेल्ट, विविध संघनक, बेलओ होस कॅनव्हर बेल्ट, होस बेल्ट आदि साहित्य या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते.
मध्यरात्री अचानक दीड वाजण्याच्या सुमारास गोडावूनमधून धूर निघत असल्याचे पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ निखील चौधरी यांना हि बाब सांगितली. त्यांनी गोडवूनजवळ येताच हि माहिती अग्नी शामक दलाला कळवली. तोपर्यंत या आगीने गोडावूनला विळख्यात घेतले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शंका…
अग्नी शामक दलाने गोडावूनकडे धाव घेतली तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. काही क्षणामध्येच आगीच्या विळख्यात सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन केमिकल मिश्रित पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. सदरची भीषण आग हि विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शंका अग्नी शामक दलाच्या जवानांनी केली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, लोणी काळभोर पोलिसांनी या आगीची नोंद केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Uruli Kanchan | उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा ७७वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
Maharashtra Govt News | शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू