Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 13:01
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Photo- Pune Prime News

दौंड, ता. 22 : शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला करून तुमची ‘राजेगावसारखी अवस्था करू’ अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. वाटलुज (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. 22) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 59 वर्षीय शेतकऱ्याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देविदास हिराजी शेंडगे, (वय-59, व्यवसाय-शेती. रा. वाटलुज, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर वैभव दादासो शेंडगे, सतिष भाऊसो शेंडगे, व दादासो भाऊसो शेंडगे (सर्व रा. वाटलुज, ता. दौंड) असे मारहाण करून धमकी देणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी देविदास शेंडगे यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देविदास शेंडगे सोमवारी दुपारी आपल्या शेतात काम करत होते. यावेळी आरोपी वैभव शेंडगे आणि सतिष शेंडगे तिथे आले. “तू माझ्या शेताचा बांध का कोरला?” असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. “तुझी राजेगावसारखी अवस्था करून तुला जिवंत मारतो,” अशी धमकी देऊन ते तिथून निघून गेले.

या घटनेनंतर देविदास शेंडगे हे आपल्या भावासोबत मोटारसायकलवरून गावात जात असताना, आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. यावेळी वैभव शेंडगे याने हातात असलेल्या कोयत्याने देविदास यांच्या डोक्यात वार केला. त्याचवेळी सतिष शेंडगे याने सत्तूर उगारून दहशत निर्माण केली, ज्यामुळे देविदास यांचा भाऊ जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेला.

वडिलांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा मुलगा विजय शेंडगे मदतीला धावून आला. मात्र, आरोपी सतिष शेंडगे याने त्याच्या हातातील सत्तूर विजयच्या डोक्यात मारून त्यालाही गंभीर जखमी केले. आरोपी दादासो शेंडगे याने काठीने मारहाण केली. डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली.

दरम्यान, रस्त्यावरील नागरिक जमा झाल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. याप्रकरणी तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार सागर म्हेत्रे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.