Fake Number Plate| पुणे : निरा येथील मुळची रिक्षाची नंबर नंबर प्लेट लावून दुसरीच रिक्षा पुणे शहरात बिन्दास्त फिरत होती. वाहतूक शाखेने या रिक्षावर ई चलान फाडले. ते चलान मुळे रिक्षामालकाला पाठविले. त्यातून पुण्यात बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीकांत मोहन वेळेकर (वय ३६, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (वय ५०, रा. निरा) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निरा परिसरात रिक्षा व्यवसाय करतात. त्यांची रिक्षा निरा येथे असताना त्यांना पुण्यात रिक्षावर दंड केल्याचे चलान मिळाले. त्यांनी आझाद रिक्षा चालक संघअनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खडकी वाहतूक विभागाला हे कळविले.
रिक्षावर बनावट नंबरप्लेट लावून व्यवसाय…
श्रीकांत वेळेकर याने रिक्षेवर बनावट नंबरप्लेट लावून व्यवसाय सुरु केला. २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता तो खडकीतील पोल्ट्री चौकात आला होता. त्यावेळी त्याच्याकडे लायसन्स नव्हते तसेच विना गणवेश तो रिक्षा चालवत होता, म्हणून वाहतूक पोलिसांनी त्यांच्या नंबरप्लेटवरुन त्याच्यावर ई चलानचा १ हजार रुपयांचा दंड केला. त्याचा मेसेज फिर्यादी यांना गेला. तो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी श्रीकांत वेळेकर याचा शोध घेऊन अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khadki Crime : आता तर हद्दच झाली राव ! पुण्यात चप्पलाच केल्या लंपास ; खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल