लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव-पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्ती जवळ एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह आज शनिवारी (ता.२९) आढळून आला आहे.
सुभाष भगवंत चौधरी उर्फ बाबूतात्या हे त्या इसमाचे नाव असून त्यांचा आज पहाटे खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
नायगाव पेठ हद्दीतील मार्ग वस्ती कडून नायगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बाबूतात्या यांचा मृतदेह आज पहाटे काही नागरिकांना आढळून आला. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. बाबूतात्या यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.