Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्रामिण पोलिसांचा स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पुन्हा एकदा ट्रॅकवर, अवघ्या 72 तासाच्या आतच पुणे-सोलापुर महामार्गावर इंदापुर हद्दीत पडलेल्या साडेतीन कोटीच्या सशस्त्र दरोड्याची केली उकल, इंदापुर पोलिसांच्या मदतीने सहा आरोपींच्यासह चोरीस गेलेला मुद्देमाल केला जप्त…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 17:18

पुणे- पुणे- सोलापूर महामार्गावर भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत शुक्रवारी (ता. २६) पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार करुन, चाराकी गाडीतील तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे (ग्रामिन) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग व इंदापुर पोलिसांना यश आले असुन, या प्रकरणातील सहा आरोपीसह लुटीतील रक्कम पोलिसांनी 72 तासाच्या आत ताब्यात घेतली आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत चारचाकी गाडीवर गोळीबार करुन, साडेतीन कोटी रुपयांची लुट करणाऱ्या टोळीचा प्रमुख सागर शिवाजी होनमाने (रा. कुर्डुवाडी ता. माढा जि.सोलापूर) हा असुन, पलिसांनी सागर शिवाजी होनमाने याच्यासह बालु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), रजत अबू मुलाणी (वय-२४ रा. न्हावी, ता. इंदापूर जि. पुणे) गौतम अजित भोसले, (वय- ३३, रा. वेने, ता. माढा, जि. सोलापुर), किरण सुभाष घाडगे (वय- २६),व भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय – २५, रा. दोघेही लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि. पुणे) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान वरील टोळीने भावेशकुमार अमृत पटेल (रा.कहोडा, ता. उंझा, जि.मेहसाना, गुजरात) यांच्या चारचाकी गाडीवर गोळीबार करुन, त्याच्याकडील तीन कोटी साठ लाख रुपयांची रोकड लुटली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर शिवाजी होनमाने याच्यासह बालु उर्फ ज्योतीराम कदम, रजत मुलाणी या तिघांना इंदापुर परीसरातुन तर गौतम भोसले, किरण घाडगे व भूषण तोंडे या तिघांना राजस्थानमधील उदयपुर परीसरातुन ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

 

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेशकुमार पटेल हे त्यांच्या चारचाकी गाडीतून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे निघाले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वरकुटे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महामार्गावरील गतिरोधक आल्याने भावेशकुमार यांनी गाडी स्लो केली. त्याचवेळी अज्ञात चार अनोळखी चोरटे यांनी पायी चालत येवुन हातात लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, भावेशकुमार यांनी गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुर रोडने पुणे बाजुकडे घेवुन जात असताना त्यांनी मारूती सुझुकी कंपनीची फोर व्हिलर स्विप्ट गाडी व टाटा कंपनीची गाडी ही मधुन फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवित नाही. म्हणुन त्यांनी गाडीवर फायरिंग केली. गाडी रस्तामध्ये अडवुन गाडी मधुन चार चोरटे उतरून त्यांच्या साथीदाराला मारहाण केली. चोरटयांनी गाडी मधील रोख रक्कम ३ कोटी ६० लाख रुपये १४ हजाराचे दोन व १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवुन नेला होता.

दरम्यान घडलेला गुन्हा गंभीर असल्याने इंापुर पोलिसांच्या बरोबरच, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखाही या गुन्हाची उकल करण्यासाठी मैदानात उतरली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन तपास पथकाच्या माध्यमातुन तपास सुरु केला होता. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनीही तीन स्वतंत्र तपास पथके तयार केली होती.

पोलिसांनी या गुन्हाचा तपास करतांना तांत्रिक विश्लेषणाचे व गुप्त बातमीचे आभारावर सदरचा गुन्हा सागर शिवाजी होनमाने व त्याच्या सहकाऱ्यांनी केल्याची खात्री पटताच, पोलिसांनी सागर होनमाने, बालु उर्फ ज्योतीराम कदम व रजत मुलाणी या तिघांमना ताब्यात घेऊन विचारपुस करताच, त्यांनी वरील गुन्हयाची कबुली दिली.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, तुषार पंदारे, बाळासाहेब करांडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, हेश गायकवाड, अजय मुळे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, विजय कांचन, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील आहीवळे, अक्षय नवले, प्रमोद नवले, इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे,सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पांडुळे, पोलीस नाईक सलमान खान, विशाल चौधर, पोलीस हवालदार, सुरेद्र वाघ, कल्यान खांडेकर, मनोज गायकवाड, सचिन बोराडे, मोहमंद आली मड्डी, बापू मोहीते, लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, विनोद काळे, सुरज गुंजाळ यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

श्री गणरायाच्या आगमनाने परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी युवक सक्रीय..,!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.