दिनेश सोनवणे
दौंड : मलठण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी भिमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपसावर दौंड पोलिसांनी मंगळवारी (ता. २) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी १ सेक्षन बोट व १ फायबर बोट असा ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तर एकावर गुन्हा दाखल केला आहे.
बाबुराव दिलीप मोरे (रा. शिरापुर ता. दौंड जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल रावासाहेब देवकाते (पो.कॉ.ब.नं. 1579 नेमणुक दौंड पोलीस ठाणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी भिमा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती दौंड पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा आरोपी बाबुराव मोरे याची बेकायदा वाळू उपसा करीत असलेली १ सेक्षन बोट व १ फायबर बोट आढळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन नदीपात्रात बुडवून नष्ट केली आहे.
दरम्यान, आरोपी बाबुराव मोरे याच्यावर पर्यावरण अधिनियम कायदा कलम व खाण खनिज अधिनियम कायदा कलमान्वये दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तारिण पुढील तपास पोलीस हवालदार लोहार करीत आहेत.