दिनेश सोनवणे
दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळणाऱ्या एकाला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि घटना मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नटराज किसन कांबळे (वय-४०, रा. दौंड, ता. दौंड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश महादेव पवार यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीत सर्विस रोडच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या मटका सुरु असल्याची माहिती दौंड पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे दौंड पोलिसांनी बुधवारी (ता. ०२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी नटराज कांबळे हा मिळून आला. त्यांच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत.