Daund News दौंड : शिक्षिका पत्नीसह दोन अल्पवयीन मुलांचा खून करुन डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरवंड (ता. दौंड) (Daund News) येथील चैताली पार्कमधील गंगासागर पार्कमध्ये मंगळवारी (ता.२०) दुपारच्या सुमारास घडली आहे. (Daund News) कौटुंबिक वादातून डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून कारण समोर आले आहे. (Daund News)
डॉ अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२), पत्नी पल्लवी (३५), मुलगा अद्वित (११), मुलगी वेदांतिका (७) अशी मृतांची नावे आहेत.
वरवंड येथील पत्नीसह दोन अल्पवयीन मुलांना ठार मारून डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण…
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल दिवेकर हे एक जनावरांचे डॉक्टर आहेत. तर त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहेत. मंगळवारी दिवसभर दिवेकर कुटुंबीयांचा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा वाजविला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा डॉ. अतुल यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. शेजारीच पल्लवी यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या गळा दोरीने आवळून खून करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच, यवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना गणेशवाडी (ता. दौंड) येथील जगताप विहिरीमध्ये मारून टाकले आहे. आणि मी स्वतः आत्महत्या करत असल्याचे डॉ. अतुल दिवेकर यांनी नमूद केले होते.
त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीत ज्या विहिरीचा उल्लेख केला होता. त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. ज्या विहिरीमध्ये मुले ढकलून दिली होती, त्या विहिरीत ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी अडचण येत होती. मात्र, अखेर रात्री उशिरापर्यंतच्या अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले.
दरम्यान, डॉ.अतुल दिवेकर हे मुलगा अद्वित व मुलगी वेदांतिका यांना घेऊन बाहेर पडले, त्या वेळी त्यांना दुचाकीवर मुलांना घेऊन जाताना काही जणांनी पाहिलेही होते. परंतु, मुलांना फिरायला घेऊन चालले असतील, असे समजून कोणी लक्ष दिले नाही. परंतु, डॉ. दिवेकर एका विहिरीजवळ गेले आणि त्यांनी दोन्ही मुलांना विहिरीमध्ये ढकलून जिवे मारले आहे.
दुपारपर्यंत डॉ. दिवेकर यांच्या घरातून काहीच हालचाल तसेच मुलेही दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी शोध घेतला, त्या वेळी ही घटना उघडकीस आली. पुढील तपास उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत करीत आहेत.