Daund News लोणी काळभोर : मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार यवत रेल्वे स्टेशनच्या रोड परिसरात मंगळवारी (ता.१३) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Daund News)
रामचंद्र राजु भोसले, रमेश शंकर चव्हाण, सानब सुमल्लेशी भोसले, करिष्मा रमेश चव्हाण (सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Daund News) याप्रकरणी रितु बोरकुल पवार (सध्या रा. यवत स्टेशन रोड, ता. दौंड, जि. पुणे,मुळगाव छोटीवनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Daund News)
मुलगी पळून नेल्याच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलगी पळवून नेल्याचा संशयावरून फिर्यादी यांचे सासरे सुरकाश पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बरगडी , पोटावर, खांदयावर व इतर ठिकाणी चाकुने वार करून गंभीर दुखापत केली आहे.(Daund News) या हल्ल्यात सुरकाश पवार हे जखमी झाले आहेत. (Daund News)
याप्रकरणी रितु पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मदने करीत आहेत. (Daund News)