Crime पुणे : तुझ्यावर माझे प्रेम आहे, तसेच तुला दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन जाऊन तिच्यावर बला-त्कार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याची घटना सहकारनगर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ पवार (वय २१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी आरोपी सोमनाथ पवार हा रहात होता. त्याने फिर्यादीस माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे सोबत लग्न करशील का अशी विचारणा केली. तेव्हा तिने नकार दिला. तरीही तिला आपल्या गाडीवर बसवून घरी साडतो असे सांगून स्वत:च्या घरी नेले.
दरम्यान, जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध केले. कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्यादी दिली असून पोलीस उपनिरीखक राजगुरु तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : मुंढव्यातील ;त्या; खुनाचा दुकानदारांकडून निषेध;
Daund Crime News : दौंड तालुक्यातील राहू येथे आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या..