Crime News | पुणे : बिगारी मुकादमाची वाहतूक विभागातून बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन धर्मा गवळी (वय-३४) असे येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.२७) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. तर याप्रकरणी एका ५५ वर्षीय बिगारी मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्राररदार हे वडगाव शेऱी क्षेत्रीय कार्यालयातील बिगारी मुकादम म्हणून घनकचरा व्यवस्थापन/आरोग्य विभागात काम करतात. तर त्यांची वाहतूक विभागातून बदली न करण्यासाठी लोकसेवक आरोपी सचिन गवळी यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
वाहतूक विभागातून बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच…
दरम्यान, सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी सचिन गवळी यांनी तक्रारदार यांची वाहतुक विभागातून बदली न करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोग्य निरीक्षक सचिन गवळी यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : मार्केटयार्ड व बिबवेवाडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी ; १८ जणांना पकडले
Pune Crime News : मार्केट यार्डातील किराणा मालाच्या दुकानाला लागली आग ; आगीमागचे कारण अस्पष्ट..!