Crime News | मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचे वडिल अगमकुमार (वय ७२) यांच्या मुंबईतील ओशिवरा परिसरातील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच माजी ड्रायव्हरने ७२ लाखावर डल्ला मारल्याचा आरोप ( Crime )करण्यात आला असून त्याच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार हा १९ आणि २० मार्च दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी सोनू निगम यांची बहीण निकिता (वय-३८) यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.२२) तक्रार दिली आहे. त्यानुसार रेहान नावाच्या माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगम यांचे वडिल अगमकुमार हे ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत एकटेच फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक लाकडी कपाटात डिजिटल पासवर्ड असलेले लोखंडी लॉकर आहे. अगमकुमार यांच्याकडे मागील ८ महिन्यांपूर्वी गाडीवर रेहान नामक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.
मात्र तो काम नीट करत नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले. अगमकुमार यांना १८ मार्च रोजी कामाचे ७२ लाख रुपये मिळाले, जे त्यांनी घरातील कपाटाच्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवले.
दरम्यान, अगमकुमार आणि निकिता हे काही कामासाठी सोनू यांच्या घरी २० मार्च रोजी गेले होते. काम झाल्यानंतर ते घरी परतले. तेव्हा घरातील लॉकरमधील ७२ लाख रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना माजी ड्रायव्हर रेहान हा १९ व २० मार्च रोजी घराजवळून सुटकेस घेऊन जाताना दिसला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime | पुणे : तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु घालून लुटले
Pune Crime : ओपन जीममध्ये वीजेच्या धक्क्याने २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू
Pune Crime : सायबर चोरट्यांचा प्रताप ; लष्करात नोकरीस असल्याचे सांगून घातला गंडा