Crime News : शिरूर कारेगाव (ता. शिरूर) येथील अवैध्यरीत्या दारू विक्री करणाऱ्या
दारू विक्रेत्यांवर रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी व इतर प्रकारची दारू जप्त केलेली आहे.(Crime News)
३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला….
पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी या भागातील अवैद्य दारू विक्री कारवाई सुरू केल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
गजानन वसंत चाळक (वय-२७) व सुनील शालिग्राम अबोरे (वय-४० दोघेही रा, कारेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कारेगाव ( ता. शिरूर ) येथील स्मशानभुमीजवळ स्वीटहोम लगतच्या पत्राशेडमध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी गजानन वसंत चाळक हा दारू विक्री करताना मिळाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विदेशी दारू ३ हजार ७४० रूपयांचा साठा केल्याचे आढळून आले आहे.(Crime News)
तर पोलिसांनी दुसरी कारवाई कारेगाव ( ता. शिरूर) येथील मराठी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या पत्राशेड मध्ये करण्यात आली. त्यात सुनील शालिग्राम अबोरे या इसमावर करण्यात आलीय. या कारवाईत देशी दारूच्या ५१ बाटल्या आढळून आल्या, ज्यांची किंमत ३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.(Crime News)
हि कामगिरी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी व विजय शिंदे यांच्या पथकाने केली आहे.