Crime News | पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळच्या वाढदिवसाचे अनधिकृत फ्लेक्स लावणे चांगलेच महागात पडले आहे. यावर पोलिसांनी कारवाई करत हिंजवडी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
चांदणी चौकातील पाईपलाईन हायवे रोड लगत झळकले फ्लेक्स…
चांदणी चौकातील पाईपलाईन हायवे रोड लगत झळकले होते. या प्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फ्लेक्स लावले होते. हिंजवडी पोलीस ठाणे व पुणे महानगरपालीका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांचे पथकाने संयुक्त कारवाई करीत होते. त्यांनी हे अनधिकृत फ्लेक्स काढुन टाकत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील नीलेश घायवळ हा कुख्यात गुंड आहे. पुणे शहर पोलिसांनी गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याचा वाढदिवसनिमित्त अति उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावले. त्यात अनेकांचे शुभेच्छूक म्हणून फोटो देखील टाकले गेले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असताना गुन्हेगारांचे होत असलेल्या उद्दातीकरणामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…