( Crime News ) पुणे : करांजविहीरे भामा आसखेड धरणावर पार्टीसाठी गेलेल्या मंद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून पाण्यात बुडून (Crime News )मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
दत्ता भारती (वय- २४ रा.वराळे, मूळ रा. बीड असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंद्यधुंद अवस्थेतील युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा केला प्रयत्न…
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ११) वराळे येथील तीन मित्र पार्टी करण्यासाठी करांजविहीरे भामा आसखेड धरणावर गेले होते. यावेळी मंद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी धारणाकाठी रिल्स शूट करताना पाय घसरून पाण्यात पडला.पोहता येत नसल्याने तो बूडू लागला यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांनी त्यांनाही पोहता येत नसल्याने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. परंतु वाचविण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्याने तो पाण्यात बुडाला.
याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतदेह शोध कार्यासाठी खेड तालुका आपत्ती निवारण टीम आपदा मित्रांशी व तळेगाव येथील आपदा मित्रांशी संपर्क साधला. मृतदेह रविवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता शोधण्यात आला.
यावेळी आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपदा मित्र संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, जिगर सोलंकी, सत्यम सावंत, सचिन वाडेकर, श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, सचिन मरगज, विक्रांत चौधरी आदींनी मेहनत घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Breaking News : आंबेठाणला शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत