Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : बाळाच्या बोबड्या बोलाचा राग आला म्हणून आईने पोटच्या गोळ्याचा गळा आवळला! उच्चशिक्षित आईचं क्रूर कृत्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 18:08
Crime News

photo- social media

Crime News : माता आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना नवी मुंबईतील कळंबोली भागात उघडकीस आली आहे. अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीला नीट बोलता येत नाही आणि ती मराठीऐवजी हिंदीत बोलते, या कारणावरून एका उच्चशिक्षित आईने पोटच्या गोळ्याची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

बोलण्यातील अडथळ्यामुळे आई होती नाराज

कळंबोली येथील सेक्टर १ मधील गुरूसंकल्प सोसायटीत हे कुटुंब वास्तव्यास आहे. पती आयटी अभियंता असून पत्नी बीएस्सी शिक्षित आहे. २०१७ मध्ये विवाह झालेल्या या दांपत्याला २०१९ मध्ये मुलगी झाली. मात्र, ही मुलगी ६ वर्षांची होऊनही तिला बोलण्यात अडचण येत होती. ती स्पष्टपणे मराठी बोलू शकत नव्हती, यावरून तिची आई सतत चिंतेत आणि रागात असायची. “मुलगी व्यवस्थित बोलत नाही, ती नको,” अशी तक्रार ती पतीकडे वारंवार करायची. पतीने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आईच्या मनातील राग कमी झाला नाही.

हृदयविकाराचा बनाव अन् पोलिसांचा संशय

२३ डिसेंबर रोजी या क्रूर कटाची अंमलबजावणी करण्यात आली. त्या दिवशी मुलीची आजी तिला भेटण्यासाठी काही भेटवस्तू घेऊन आली होती, पण तिला आपल्या नातीला भेटता आले नाही. रात्री पती घरी परतल्यावर मुलगी झोपेतून उठत नसल्याचे नाटक आईने केले. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव आईने रचला. मात्र, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना या घटनेत संशय आला आणि त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.

सहा तासांच्या चौकशीत सत्य आले बाहेर

शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा आई-वडिलांची कसून चौकशी केली, तेव्हा सुमारे सहा तासांच्या उलटतपासणीनंतर आईने आपला गुन्हा कबूल केला. मुलीला संपवल्यानंतर तिने स्वतःचे कृत्य लपवण्यासाठी खोटा बनाव रचला होता. दरम्यान, संबंधित महिलेवर मनोविकार तज्ज्ञांचे उपचार सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46
Next Post
Crime News: Maharashtra is shaken! First the parents were killed; then the brothers committed suicide under the train; The entire family was destroyed because of 'that' one reason

Crime News: महाराष्ट्र हादरला! पहिले आई-वडिलांना संपवलं; नंतर भावांची रेल्वेखाली आत्महत्या; 'त्या' एका कारणाने अख्ख कुटुंब उध्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp