लोणी काळभोर : चोरीछुपे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीची दारू चारचाकी गाडीतून विक्री करणाऱ्या अड्डयांवर, गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी छापा टाकून अड्डा उध्वस्त केला आहे. वाघोली रोड परिसरातील बकोरी (ता. हवेली) ग्रामपंचायत ह्द्दीतील डोंगराजवळ शुक्रवारी (ता. २१ ) हि कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून तब्बल ७० हजार रुपयांची गावठी दारू व २१ लाख रुपयांची एक चारचाकी गाडी असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कपिल शिवाली येलुरे (वय – ३०) व प्रदीप गुलाब मुजमुले वय २७), रा. दोघेही कोलते पाटील, आयव्ही इस्टेटजवळ, मोकळ्या जागेत पत्र्याचे शेडमध्ये, ड्रीम संकप्ल्प सोसायटी रोड, वाघोली, बाळु कटके रा. कटकेवाडी, वाघोली), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक हद्दीत गस्त घाली असताना, युनिटकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना बातमी मिळाली की, डोंगराजवळ, बकोरी रोड, वाघोली येथे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता काही इसम अवैधरित्या दारु विक्री करत आहेत.
सदरची महिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, सदर ठिकाणी पोलीस पथक गेले असता एका पत्र्याचे शेडमध्ये व मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या वॅगनार कार मधुन कपिल येलुरे, प्रदीप मुजमुले व बाळु कटके हे तिघेजण अवैध रित्या दारु विक्री करत असताना दिसून आले.
दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन ७० हजार रुपयांची गावठी दारू व 2 लाख रुपयांची एक चारचाकी गाडी, असा 2 लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.