हडपसर : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून २० जणांना ताब्यात घेऊन १ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ०५ केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेऊन छापा टाकला असता काही जण पैशांवर कल्याण जुगार खेळताना आणि खळवत असल्याचे दिसून आले.
यावेळी पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडू रोख रक्कम ३१, ४१० रुपये, ७० हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी २० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या १९ जणांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली आहे.