प्रतिनिधी अमित मुंडीक
Crime : आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय बातमीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई स्वामीनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोड, आंबेगाव खुर्द, पुणे येथे करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित सुयश सोमनाथ घोडके (वय २४, रा. नऱ्हे, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे ४१ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

आरोपीस अटक करून न्यायालयाकडून २३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







