जळगावः येथील निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले असता यावेळी दोन समुहांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत भाजपचा कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकळी ग्रामपंचायतीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
या हाणामारीत दगडफेक झाली. दगडफेकीत धनराज माळी या कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर मृत्यू झाल्याचे समजले.
उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी धाव घेतली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.