दौंड : चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधीकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत.
पुण्याचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर कलम ४२०, ४६४, १२० ब, १९१,१९२, १९ अशा विविध गंभीर कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांनाकडे केली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असे न्यायालयास दर्शविले होते.
दरम्यान, तक्रारदार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांच्याकडे तीनही आरोपींच्या विरोधात पुरावा असताना, पोलिसांनी आरोपी पोपट तावरे याला मदत करण्याकरता जाणून बुजून खोटा अहवाल पाठविला. फसवणूक करणे, कर्तव्यात फौजदारी स्वरुपाची कर्तव्य कसूर करणे. या कारणास्तव न्यायालयामध्ये तक्रारदार यांनी अॅड. राजेश काटोरे व अँड अमीत काटे यांचे मार्फत तक्रार दाखल केली होती. यावर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलीसांनी तावरे यांना तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे.
त्यानंतर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलीसांनी पोपट तावरे यांना गुन्हयातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढत पुण्याचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.