पुणे : कर्तव्यात कसूर केल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी बदली केल्यानंतर त्याविरूध्द महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) दाद मागण्यासाठी गेलेल्या चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम यांच्यावर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश (मॅट) ने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी बदली केलेल्या ठिकाणी हजर न होता, थेट मॅट कोर्टामध्ये अर्ज करून शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मॅट कोर्टानेच संबंधित पोलिस निरीक्षकावर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मॅट कोर्टाचे आदेश प्राप्त होताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम यांना निलंबीत केले आहे.
दरम्यान, मॅटने निरीक्षक कदम यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास दिले होते. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांना शुक्रवारी निलंबीत केले आहे.