शिरूर : शिरूर शहर परिसरात सिनेस्टाईलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी सातारा परिसरातून सापळा रचून गजाआड केले आहे.
हादीहसन सर्फराज इराणी (वय-२३, रा. पाटकर प्लॉट नं.०८ महात्मा गांधी वसन शिवाजीनगर पुणे) असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आशा मारूती गरगटे, वय ६७ वर्षे, रा. मंगलमुर्ती नगर, जलसा हॉटेल मागे, शिरूर, ता. शिरूर, यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरूर नवीन नगरपालिका कोडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा गरगटे हया पायी जात असताना एका अज्ञात इसमाने काळया रंगाचे पल्सर मोटारसायकल वरून येवुन त्यांचे गळयातील ६० हजार रुपये किमतीचे मिनीगंठण चोरून नेले होते. याबबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा शिरूर पोलीस तपास करीत असताना शिरूर से चंदननगर असा सी. सी. टी. व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण याद्वारे सतत प्रयत्न करून आरोपी यांचे पल्सर मोटारसायकलचा प्रथम शोध लावला. त्या मदतीने तसेच सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे हादीहसन इराणी हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्याने तो सतत त्याचे ठाव ठिकाण बदलत होता. त्यादेबाबत खात्रीशीर बातमी काढून त्यास सापळा रचुन सातारा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच त्याच्याकडून पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, त्याला न्यायालयात हजार केले असता सोमवारी (ता. ०६) पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश पट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राकर, शिरूर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, नाथा जगताप, विनोद मोरे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे यांचे पथकाने केली आहे.