दौंड : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला भीमसैनिकांनी विरोध दर्शविला. त्यानंतर याप्रकरणी भिडे समर्थकांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दौंड पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच याचवेळी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी दौंड पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याचा आरोप केला असून, या कारवाई विरोधात भीमसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भीमसैनिकांनी केली आहे.