Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झोकून देऊन काम करणाऱ्या महिलांची समाजाला गरज : आमदार बबनराव शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 January 2023, 11:07

राजेंद्रकुमार गुंड

माढा : आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने महिला देखील उल्लेखनीय योगदान देत आहे. मानेगाव येथील महिला बचत गटाच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी लांडगे यांनी आपल्या सामाजिक व राजकीय पदांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार बबनराव शिंदे यांनी काढले.

मानेगाव येथे महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील, तालुका व्यवस्थापक अवधूत देशमुख, तालुका कृषी अधिकारी बी.डी.कदम, कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख, डॉ.विकास मस्के, मयूर काळे, हनुमंत बोराटे, विजय जाधव, ग्रामसेवक सुभाष गळगुंडे, मेजर गणेश लांडगे, शरद सातपुते, सुहास लांडगे, अविनाश शिंदे, हनुमंत भालेराव, शीतल देशमुख, रेखा पवार, देवशाला ताटे, भारती शिंदे, प्रतिभा नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

प्रास्ताविक करताना आयोजक प्रमोदिनी लांडगे यांनी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ४५ महिला बचत गटाच्या माध्यमातून माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना महिलांचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार बबनराव शिंदे व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,प्रत्येक कर्तृत्वावान पुरुषांच्या पाठीमागे जशी स्त्री खंबीरपणे उभी असते तसेच प्रमोदिनी लांडगे यांच्या पाठीशी त्यांचे पती सुहास लांडगे उभे आहेत. प्रमोदिनी लांडगे यांना ज्या ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे त्यामुळे आज समाजाला अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची गरज असल्याचे सांगून बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित पदार्थ व वस्तूंना भविष्यात शाश्वत बाजारपेठे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे म्हणाल्या की, प्रमोदिनी लांडगे यांची समाजातील तळागाळातील गोरगरीब लोक व महिलांसाठी काम करण्याची इच्छा व तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने चांगले काम करणाऱ्या महिलांना समाजाने स्वीकारून त्यांनी सहकार्य व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रमोदिनी लांडगे यांनी बचत गटाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक व राजकीय पदांच्या माध्यमातून महिलांची मोठी फळी उभी करून संघटन कौशल्याचा आदर्श निर्माण केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अतुल देशमुख यांनी केले.आभार सुनयना क्षीरसागर यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी दिलीप पवार यांची नियुक्ती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.