अतुल जगताप
वडूज : वडूज ता खटाव येथील एका सर्व्हिसिंग सेंटर पाडून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अध्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सन २००५ मध्ये सर्व्हे नंबर ३७०/३ मधील दोन आर क्षेत्र व सर्व्हिसिंग सेंटर सुरेश विठोबा देवकर रा. बनपुरी ता. खटाव यांचे कडून निकम यांनी विकत घेतले होते.
सदरच्या जागेतील सेंटर हे निकम यांच्याकडे काम करणारे कामगार चालवित होते. निकम यांच्या शेजारी सुनिल हिंदूराव गोडसे व युवराज उर्फ पिंन्टू हिंदूराव गोडसे रा.वंडुज यांचा प्लॉट आहे. यातील सुनिल हिंदुराव गोडसे यांनी सदर जागेची खाजगी मोजणी करुन घेतली आहे. त्यावरून त्यांनी निकम यांना सांगितले की, तुमची भिंत गोडसे यांच्या जागेत येत आहे.
त्यांनी त्यांचे जागेत तार कंपाउंड व सर्व्हिसिंग भिंत आहे. भिंत काढुन घ्या असे सांगितले होते. त्यावेळी शासकीय मोजणी आणुन मोजुन घ्या व नंतर सेंटरची भिंत आली तर काढु असे सांगितले होते. दि.१० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व्हिसिंग सेंटर बंद करून गेल्यानंतर ते सेंटर पाडण्यात आले.
याबाबत वडूज पोलीस ठाणेस रजि.नंबर ६९७/२०२२भारतीय दंड विधान कलम ४२७,३४ प्रमाणे आरोपी सुनिल गोडसे, युवराज गोडसे, अनिल पवार, शशिकांत काळे, नितीन काळे, संग्राम गोडसे रा वडूज यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात फिर्यादी बबन निकम यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबसे करीत आहेत.