उरुळी कांचन, (पुणे) : येथील पदमश्री को. ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेत तब्बल सव्वा कोटी रुपयांची अफरातफर करणाऱ्या संस्थेच्या संस्थेच्या तत्कालिन उपाध्यक्षासह, सस्थेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे (रा. तुपेवस्ती, लोंढे चाळ, ऊरुळीकांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असुन, लोणी काळभोर पोलिसांनी व्यवस्थापक विकास लोंढे याला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झालेले संस्थेचे उपाध्यक्ष संजय कांचन यांचे काही दिवसापुर्वी निधन झालेले आहे.
दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी संस्थेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे या दोघांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी, संस्थेच्या संचालक मंडळाला मात्र मोकाट सोडले आहे. या प्रकरणात संचालक मंडळाचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे. दरम्यान पदमश्री को. ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेच्या वरील दोघांच्यावर गुन्हा दाखळ झाल्याचे वृत्त समजताच, उरुळी कांचनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटी आहे. यामध्ये २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर यांनी यशवंत पोंदकुले यांची नेमणूक केली होती. मागील दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण केले असता संस्थेकडुन ठेवीदारांच्या रक्कमेतून ८३ लाख २६ हजार, ३०४ रुपये एवढी रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे दिसुन आले. त्यांनी चौकशी करुन कागदपत्रांची पाहणी केली असता सदर रक्कम संजय कांचन व विकास लोंढे यांनी संगनमत करुन रोख स्वरुपात काढली असल्याचे दिसुन आले.
दिगंबर कांचन यांनी संस्थेचे इतर संचालक यांच्या अनुपस्थितीमध्ये मासिक बैठक घेवुन नमुद बैठकीचे प्रोसिंडीगमध्ये फक्त स्वताची स्वाक्षरी करुन संचालकास माहिती न देता ४५ लाख रुपये रक्कमेची कर्ज प्रकरणे स्वतःच्या सहीने परस्पर मंजुर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सदरचा अहवाल मा. उप-निबंधक सहकारी संस्था पुणे शहर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयात सादर केला असता नमुद प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश यशवंत भागुजी पोंदकुले यांना देण्यात आले होते.
दरम्यान, पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटीचे सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षणामध्ये नमुद संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय दिगंबर कांचन व नमुद संस्थेचे व्यवस्थापक आरोपी विकास मारुती लोंढे यांनी संस्थेची एकुण १ कोटी २८ लाख २६ हजार ३०४ रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपी विकास लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची रिमांड दिली आहे.
संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार का?
दरम्यान पदमश्री को. ऑप क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेत तब्बल सव्वा कोटी रुपयांची अफरातफर करणाऱ्या संस्थेच्या संस्थेच्या तत्कालिन उपाध्यक्षासह, सस्थेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असला तरी, या गुन्हात संस्थेचे संपुर्ण संचालक मंडळ सहभागी असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी “पुणे प्राईम न्युज” शी बोलतांना केला आहे. वरील दोघांच्याबरोबरच संस्थेच्या कांही संचालकांनी संस्थेतुन बेकायदा रक्कम उचलल्याचे चौकशीत दिसुन आले होते. मात्र वरील दोघांना बळीचा बकरा बनवुन, संचालक मंडळ स्वतःला वाचवु पहात असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला आहे.