औरंगाबाद : महाविद्यालयात दुपारी जेवणाची सुट्टी..प्रयोगशाळेत प्राध्यापक कक्षात संशोधक विद्यार्थिनी एकटीच बसलेली असताना एका विद्यार्थ्यांनेअचानक तिला पेटवून दिल्याने खळबळ उडाली.
प्रेम प्रकरणातून स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:ला पेटवून घेणारा गजानन मुंडे हा तरुण संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता.
त्याचे तरुणीवर प्रेम होते. पण, तरुणीनं लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तरुणीला पेटवलं आणि स्वत:लाही पेटवून घेतलं. आणि नंतर तरुणीला मिठी मारली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. ही घटना काल सोमवार (ता.२१) औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत घडली. संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
महाविद्यालयात काल दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली.
विद्यार्थिनी आणि गजानन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाले होते. त्याबाबत मुलीने पोलिस ठाण्यात दोन – तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती.
मात्र, साधारण अदखलपात्र नोंद करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली.