Buldhana Accident News शिरूर : शहरातील अनेक खाजगी ट्रॅव्हल्सचालक आपली बस हाऊसफुल कशी होईल यासाठी अट्टहास असतो. झटकन गाडी भरायची अन शक्य तेवढ्या लवकर मार्गस्थ व्हायच. हा व्यवसाय करणारे प्रवाशांच्या जीवाशी खेळतात. (Buldhana Accident News) कारण ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थीतीत जीव कसा वाचवायचा याची माहिती नसते. (Buldhana Accident News) यामध्ये आपली घरी कुणी तरी वाट पहातय…प्रपंचाचा गाडा ज्यांच्या खांद्यावर असणारे…जे उद्याच भविष्य घडविणारे… अशा स्थितीत असणाऱ्या प्रवाशांचा नाहक बळी दिला जात आहे. (Buldhana Accident News)
खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यातील सिंदखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भिषण अपघातानंतर लागलेल्या आगीत प्रवाशांना भयावह मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स गाड्या मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. यासाठी अनेक खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करण्याची सुवीधा करून दिली आहे. हजारो प्रवासी यामधून प्रवास करताना दिसतात. अपघात झाला की चालक व वाहक पळून जातात. मात्र यामध्ये प्रवासी अडकून जातो. त्यांना आपत्कालीन स्थितीत सुटका कशी करून घ्यावी. याची माहिती नसते.त्यातून असे अपघात झाल्यावर मृत्यू हा अटळच आहे. .
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर ही या मार्गावर प्रवाशांचे जीव वाचविण्यासाठी सुवीधा नसल्याचे दिसून येत आहे. त्यातून अपघाताची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील महामार्गावर मदत केंद्रे नाही की अग्नीशमन केंद्रही नाही. प्रवासी व ट्रॅव्हल्स करिता महामार्गावर सुवीधांचा अभाव असून शौचालय व प्रसाधनगृहाची सुवीधा नाही. जेवनासाठी हॅाटेल किंवा ढाबा नाही. पेट्रोल पंपाची संख्या अतीशय कमी आहे. यु टर्न घेण्यासाटी विलंब लागत असून त्याचे अंतर जवळपास ६० किलोमिटर आहे. प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास वेळेत सुवीधा मिळण्याची आवश्यकता आहे.
आग विझविण्यासाठी यंत्रणा कुठे आहे. आपत्कालीन दरवाजा कुठे आहे. त्याचा वापर कसा करावा. ब्रेकेबल काच असेल तर ती फोडण्यासाठी लागणारी हतोडी कुठे ठेवली आहे. काचा सहज फुटणारी असावी. यासाठी ट्रॅव्हल्स च्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे.
शिरूर येथील गरीब आणि अंपगत्वावर मात करत शिक्षकी पेशा स्वीकारलेले. नातेसंबधात सगळ्यांना शिक्षणासाठी मदत करत मुलीला डॅाक्टर तर मुलाला वकील करण्यासाठी धडपडणारे कैलास गंगावणे यांचा, त्यांची पत्नी कांचन व मुलगी सई हिचा सिंदखेड राजा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आपघाताने रचलेली स्वप्न क्षणांधार्त संपली. या कुटूंबावर काळाचा घाला असला तरी ट्रॅव्हल्स प्रवास महागात पडला. पण यात त्यांची चूक काय ? एक चांगले कुटूंब उध्वस्त झाल्याने समाजमन हळहळताना दिसत आहे.
राज्य व केंद्राची मदत या प्रवासात मृत झालेल्या कुटूंबाना मिळणार आहे. मात्र या पुढील काळात या समृद्धी महामार्गावर अशीच अपघाताची मालिका सुरू राहणार का? देशभरात ट्रॅव्हल्स साठी वेगळे काही काहि नियम लागू करणार का ? चालकाची तपासणी साठी काहि यंत्रणा राबवली जाणार का ? असा सवाल सर्वसामान्य लोकांमधून येऊ लागला आहे. या घटनेची कसून चौकशी केली जावी. त्या पाठोपाठ यापुढे अशी घटना पुन्हा होऊ नये. यासाठी काय उपाययोजना करता येतील याकडे लक्ष दिले जावे. अशी मागणी नागरिकांमधून येऊ लागली आहे.
निरगुडसर ( ता. आंबेगाव ) येथील निरगुडेश्वर शिक्षण संस्थेत प्रा. कैलास गंगावणे हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. सांस्कृतीक विभागाची जबाबदारी ते संभाळत होते. शांत स्वभाव, संयमी, मितभाषीय यामुळे विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते. समृद्धी मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे शाळेचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यांची जागा भरून काढणे कठीण आहे.
प्रदिप वळसे पाटील (अध्यक्ष-निरगुडेश्वर शिक्षण संस्था निरगुडसर, ता. आंबेगाव )