Buldana Bus Accident : धुळे : समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू हा ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडली असल्याचा फॉरेन्सिक अहवालात दिसून येत आहे. Buldana Bus Accident
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने शनिवारी (ता. ०१) प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
अपघाताच्या दिवशी बसचालक शेख दानिशच्या गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहल सापडले आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (अमरावती) यांनी याबाबत अहवाल दिला आहे. चालक शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं असल्याचे अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, दानिश शेखच्या रक्तात ३० टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे १ जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला का अशी शंका आता निर्माण झाली आहे. Buldana Bus Accident