Breaking News | पुणे : दोन दिवसांपूर्वी राजगड पोलिसांनी पकडलेल्या तब्बल ७० लाखाच्या गुटख्यासह ट्रक खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोरून पळवून नेल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.२८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांच्या ताब्यातील गुटख्याचा ट्रक पळवून नेल्याने परीसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलिसांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर गुरुवारी (ता.२५) गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. या ट्रकमधून सुमारे ७० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.
ट्रक खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर उभा…
याप्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलां होता. तसेच जप्त करण्यात आलेला गुटखा पंचनामा करून ट्रकमध्ये ठेवून ट्रक खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर उभा करण्यात आला होता.
दरम्यान, आज रविवारी पहाटे अज्ञातांनी खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर उभा असलेला पळवून नेला. हा ट्रक पोलिसांना शिंदेवाडी गावच्या हद्दीत सापडला. मात्र चोरट्यांनी हात साफ करून तब्बल ७० लाखाचा गुटखा चोरून नेला.
रायगड पोलिसांनी गुटखा आणि आरोपींना शोधण्यासाठी पथक तयार केले आहे. पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे. मात्र खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोरून गुटख्यासह ट्रक पळवून नेल्याने पोलिसांविषयी परीसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी….
Pune Crime : पुण्यात खुनाचे सत्र सुरुच! दांडेकर पुलाजवळ एकाचा निर्घृण खून
Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार