दौंड : दौंड येथील म्हसोबा यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्यांनी १७ नागरिकांचा चावा घेतल्याची घटना दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात येथे घडली आहे. या
मुळे यात्रेत एकच गोंधळ उडाला. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात (ता.दौंड ) येथे मंगळवारी १५ नोव्हेंबरला म्हसोबा यात्रेत पिसाळलेले कुत्रे घुसले आणि यात्रेसाठी आलेल्या भाविकांपैकी सतरा भाविकांचा त्याने चावा घेतला. यामुळे यात्रेत एकच खळबळ उडाली.
पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतल्यानंतर काही जणांना खबरदारीचा उपाय म्हणून पुणे येथे नायडू हॉस्पिटल व ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.