Breaking News : पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) यांचा मृतदेह राजगड किल्यावरील (ता. वेल्हे) सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मित्र सध्या फरार
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. ही माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे 12 जून रोजी दुचाकीवरून राजगड किल्ला परिसरात गेले होते. (Breaking News ) सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली.
सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे धक्कादायक वास्तव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. (Breaking News ) त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता राहुलचे लोकेशन बाहेरच्या राज्यात असल्याचे समोर येत आहे. राहुल पसार झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्याभोवती फिरू लागली आहे. जोपर्यंत तो ताब्यात मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला? हे समजू शकणार नाही.
दर्शना ही त्याचा मित्र राहुल हांडोरे याच्या सोबत ट्रेकिंगला गेले होते. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केले नसल्याचे घरच्यांना सांगितले आहे.
दर्शना पवारने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (MPSC) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (RFO) पोस्ट मिळवली होती. त्यामुळे तिचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार स्वीकारण्यासाठी दर्शना पुण्यात आली होती. त्यामुळे ती नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे थांबली होती. (Breaking News ) पुण्यात दोन, तीन ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर ती मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगून सिंहगडावर आणि राजगडावर ट्रेंकिगला गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी सगळीकडे चौकशी केली. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली होती.