पुणे – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या छाप्यानंतरही लोणी काळभोरमधील इंधन पुरवठा कंपनीतून बाहेर पडलेल्या टँकरमधील डिझेल, पेट्रोलची परस्पर विक्री करण्याचा गोरख धंदा सुरुच आहे. टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याच्या संशयावरुन मागिल दहा दिवसाच्या कालावधीत वीसहुन अधिक टँकर जप्त केले आहेत. मात्र जप्त केलेल्या टॅंकरवर पोलिस अथवा तेल कंपणी कारवाई करत नसल्याने, या प्रकरणाचे गांभिर्य आनखीनच वाढले आहे.
लोणी काळभोरमधील इंधन पुरवठा कंपनीतून बाहेर पडलेल्या टँकरमधील डिझेल, पेट्रोल परस्पर चोरुन, त्याची परस्पर विक्रीचा करणाऱ्या टोळीवर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पंधरा दिवसापुर्वी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी बालाजी मधुकर बजबळकर (वय ४१ ),दत्तात्रय गजेंद्र बजबळकर (वय ४१, दोघे रा. आनंद नगर, माळवाडी) उत्तम विजय गायकवाड (वय ३१), अजिंक्य मारुती शिरसाठ (वय २६ तिघे रा. लोणी काळभोर), साहिल दिलीप तुपे (वय २२) या आरोपींना अटक करण्याबरोबरच, इंधनवाहू टॅंकरमध्ये चोर कप्पे असण्याच्या संशयावरुन तब्बल बारा टॅंकर ताब्यात घेतले होते.
त्यानंतर मागिल आठ दिवसाच्या कालावधीत पोलिसांनी आनखी आठ टॅंकर ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेले टॅंकर कंपणीच्या आवारातच उभे केले असुन, संबधित टॅंकरवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलिसांचा तपास त्यांच्या पध्दतीने सुरु असला तरी, कंपनीने वरील टॅंकर मालक अथवा टॅंकर वाहतुकदारांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र कंपनी कारवाईपासुन स्वतःला दुर ठेवत असल्याने, या कारवाई बद्दलचा संशय वाढला आहे.
असे केली जाते चोरी…
इंधनवाहु टॅंकरमध्ये आतल्या बाजुला कोणाच्याही लक्षात न येईल अशा पध्दतीने दोनशे लिटरपासुन ते चारशे लिटर क्षमचेता कप्पा बनवला जातो. इंधनाची वाहतुक करणारा टॅंकर पेट्रोल पंपावर पोचताच, विशीष्ठ सळईच्या (डिप) च्या माध्यमातुन टॅंकरमध्ये किती लिटर इंधन आहे याची तपासणी केली जाते. तपासणीत पंप चालकाला योग्य वाटले तरच, इंधन खाली करण्यास परवागी दिली जाते.
इंधन खाली केल्यानंतर, पंप मालकाचा एक माणुस टॅंकरवर जाऊन टॅंकर खाली झाला का याची पहाणी करतो. पंप मालकाचा माणसाला टॅंकर खाली झालेचे दिसत असले तरी, चालकाने तयार केलेल्या कप्प्यात, कप्प्याच्या क्षमतेप्रमाने इंधन राहते. व कप्प्यात राहिलेले इंधन परतीच्या मार्गात काढुन त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. अशा गोरख धंद्यातुन टॅंकर चालक हजारो रुपये कमवत असल्याची चर्चा आहे. यामुळे पेट्रोल पंप चालकांनो सावधान, टॅंकरमधील “चोर” कप्प्यांच्यामाधुन टॅंकर चालक प्रतिदिन हजारो लिटर पेट्रोल-डिझेलवर डल्ला मारत नसल्याची खात्री करुन घ्या.
दरम्यान एचपी, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम या पुर्व हवेलीमधील तीन पैकी एका तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एकाच दिवसी नऊ टॅंकरमध्ये चोर कप्पे आढळुन आले आहे. कंपणीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, तीनही डेपोमधुन इँधनाची वहातुक करणाऱ्या अनेक टॅंकरमध्ये चोर कप्पे असण्याची शक्यता आहे. टॅंकर मालकाच्या नकळत टॅंकर चालकांनी चोर कप्पे तयार करुन घेतल्याची चर्चा आहे. या चोर कप्प्याच्या माध्यमातुन पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हातील शेकडो पेट्रोल पंप चालकांना प्रतिदिन लाखोंचा गंडा घातला जात असल्याची चर्चा आहे.