Big News : गोंदिया : शेतात भात लावणीचे काम सुरु असतानाच, मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शेतमालकासह एका कामगार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाडी (ता. गोरेगाव, जि. गोंदिया) गावात शुक्रवारी (ता.४) घडली आहे. तर मधमाशांच्या या हल्ल्यात पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला होता. (Big News)
पाच शेतमजूर गंभीर जखमी;
सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या हल्ल्यात अंकित लक्ष्मीचंद पटले (वय-२७), ग्यानीराम उईके (वय-५७), माया आमडे (वय-४२), मंदा आमडे (वय-४२), प्रमिला चौधरी (वय-३०, सर्व रा. कुऱ्हाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. (Big News)
मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाडी येथील शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू होते. त्यांच्या शेतात पाच मजूर काम करीत होते. सर्व शेतमजूर गुरुवारी (ता.०३) भात लावणीचे काम करुन संध्याकाळी घरी चालले होते. त्याचवेळी मधमाश्यांनी हल्ला चढविला. (Big News)
दरम्यान, या हल्ल्यात शेतमालक लक्ष्मीचंद पटले, त्यांचा मुलगा अंकित पटले व माया आमडे, मंदा आमडे, प्रमिला चौधरी, ज्ञानीराम उईके हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान सुमन आमडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.