Big news : पुणे : पुणे इसिस (आयएसआयएस) मोड्यूल प्रकरणी फरार आरोपी शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटक केलेले दहशतवादी मो. शाहनवाज आलम, मोहम्मद रिजवान अशरफ उर्फ मौलाना आणि मोहम्मद अरशद वारसी यांच्याकडून, इसिस मॉड्यूल प्रकरणात महिलांचाही सहभाग असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. इसिस मॉड्यूलमध्ये तीन महिला सहभागी असून, त्यामध्ये फरार असलेला मो. रिजवान याची पत्नी अलफिया, मो. शाहनवाज याची पत्नी मरियम आणि बहिणीचा सहभाग आहे. त्या तिन्ही महिला फरार झाल्या आहेत.
तिन्ही महिला फरार
या तिनही महिला इसिसच्या दहशतवादी विचाराने प्रेरीत झाल्या होत्या. तसेच दशतवादी घटनांचे समर्थन करत होत्या. आयएसआयने या महिलांना दहशतवादी बनवणे सुरु केले होते. या प्रकरणात फरार असलेला रिजवान त्याची बायको अलफिया, मरियन हे सर्व जण जामिया विद्यापीठात भेटत होते. (Big news) अलफिया ही पदवीधर होती. पाकिस्तानात बसलेल्या हँडलरशी ती बोलत होती. आता दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, बिहार आणि केरळमध्ये त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक राज्यांमध्ये गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट त्यांनी आखला होता. (Big news) तसेच एखादा राजकीय नेता, उद्योगपती किंवा फिल्म स्टर यांना बॉम्बने उडवण्याची त्यांची योजना होती. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांना बॉम्बस्फोट घडवून आणायचा होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : अजित पवार पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री; तर सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील