Big News फुरसुंगी, ता. १५ : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनगणना २०२७ मोहिमेला फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद हद्दीत मोठा धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. जनगणना प्रशिक्षणासाठी आदेश देऊनही सात शिक्षक आणि सपोर्ट स्टाफ गैरहजर राहिल्याने प्रशासनाने थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. Big News

1) प्रणिता सिन्हा (शिक्षक) 2) अश्विनी देवरे (शिक्षक), 3) इपशिता मोहंती (शिक्षक) 4) श्रद्धा तमशेट्टी (शिक्षक) 5) मनिषा हतागळे (सपोर्ट स्टाप) 6) उज्वला लोंढे (सपोर्ट स्टाप) 7) शशिकला सिध्दे (सपोर्ट स्टाप) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आबासो दादासो मुढे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Big News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत नगर परिषद क्षेत्रातील १६ वॉर्डांमध्ये २८४ घरगट तयार करण्यात आले असून, त्यासाठी २८४ प्रगणक आणि ४२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. नगर परिषदेकडून २३ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान जनगणना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी फुरसुंगीतील वॉलनट स्कूलमधील शिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करण्यात आली होती. Big News
मात्र, प्रणिता सिन्हा, अश्विनी देवरे, इपशिता मोहंती, श्रद्धा तमशेट्टी, मनिषा हतागळे, उज्वला लोंढे आणि शशिकला सिद्धे या सात जणांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रशिक्षणाला गैरहजर राहत प्रशासनालाच धक्का दिला. विशेष म्हणजे, नगर परिषदेकडून नोटीस बजावूनही संबंधित कर्मचारी प्रशिक्षणासाठी हजर झाले नाहीत. एवढेच नव्हे तर जनगणनेचे काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. Big News
“जनगणना म्हणजे राष्ट्रकार्य”; प्रशासनाचा कडक पवित्रा
जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या नियोजनाचा पाया मानली जाते. लोकसंख्या, विकास आराखडे, शासकीय योजना आणि निधी वाटपासाठी जनगणनेची माहिती अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत प्रशिक्षण टाळणे आणि कामास नकार देणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी संबंधित सात जणांविरोधात जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. Big News
शिक्षण क्षेत्रात खळबळ; शिक्षकांवर गुन्हा दाखल होण्याची दुर्मिळ घटना
जनगणना कामकाजावरून शिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर थेट गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी आदेश झुगारून दिल्यास प्रशासन किती कठोर भूमिका घेऊ शकते, याचे हे उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात सातही जणांविरोधात जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Big News







