विशाल कदम
लोणी काळभोर, (पुणे) Loni Kalbhor Crime : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन मुलांची “शालेय कागदपत्रे” काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराने एका विवाहीत महिलेची एक्क्यान्नव हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान पत्रकाराने काम न केल्याने पैसे मागण्यास गेलेल्या महिलेला व तिच्या दोन मुलांना पत्रकाराने जिवे मारण्याचा धमकी दिलेल्याचेही पुढे आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी हिंजवडी येथील एका ४९ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी हनुमंत राजकुमार सुरवसे (रा. माळीमळा, लोणीकाळभोर ता. हवेली) या जनप्रतिसाद या पोर्टलच्या कथीत पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन, हनुमंत सुरवसे याला अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिंजवडी परीसरातील रहीवाशी असली तरी, तिचे पती जेलमध्ये असल्याने ती काही काळ मांजरी फार्म परीसरात राहण्यास आली होती. या काळात तिची मुले कदमवाकवस्ती परीसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होती. मुलांची फि थकल्याने संबधित शाळेने मुलांना शाळेत बसु देण्यास नकार दिल्याने, संबधित महिला मुलांच्या शाळेचा दाखला काढण्यासाठी एका मध्यस्थीने सुरवसे याच्याकडे आली होती.
यावेळी सदर महिलेचा विश्वास संपादन करून सुरवसे हा फिर्यादी महिलेला शाळेत घेऊन गेला. यावेळी शाळेतील कर्मचारी यांनी दोन चार दिवसात दाखला दिला जाईल असे सांगितले. त्यानंतर सुरवसे याने शाळेच्या बाहेर आल्यानंतर शाळा दोन ते अडीच लाख रुपये मागत असुन तुम्ही मला एक लाख रुपये द्या. असे म्हणाला. त्यावेळी मी माझे मुलांचा शाळेचा दाखला मिळत असुन त्यांना दुसऱ्या शाळेत अॅडमिशन घेता येईल, त्यामुळे फिर्यादीने सुरवसे याला काही रोख तर कांही बॅंक खात्यावर असे एकुण ९१ हजार रुपये रक्कम दिले होते. मात्र पैसे मिळताच, सुरवसे याने संबधित महिलेले टाळण्यास सुरुवात केली होती.
दरम्यानच्या काळात वारंवार पाठपुरावा करुनही शालेय कागदपत्रे मिळत नसल्याने, संबधित महिले सुरवसे याच्याकडे पैसे परत द्यावेत, यासाठी तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळुन सुरवसे याने महिलेला दोन धनादेश दिले. मात्र दोन्ही धनादेश हे न वटल्याने फिर्यादी यांनी सुरवसे याला फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, २१ मार्चला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला हि शाळेत आल्या व हनुमंत सुरवसे याला फोन करुन बोलावले व माझे पैसे दिले नाही तर मी पोलीसांत तक्रार देण्याबाबत सांगितले. यावेळी सुरवसे म्हणाला कि, तु माझ्या विरोधात पोलीसात तक्रार करणार का? तुला लय मस्ती आली का? मी पत्रकार आहे माझी कोणीही वाकडे करु शकणार नाही, मला दिलेल्या पैशाबाबत जर कोणाला बोलली तर तुला व तुझ्या मुलांना मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यावर संबधित महिलेनी लोणी काळभोर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor Crime | कुंजीरवाडी येथील मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Loni Kalbhor News : पुणे – सोलापूर महामार्गावर ‘ओव्हरलोड’ गाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला ; तर RTO कोमात..