हनुमंत चिकणे /जीवन शेंडकर
Big Breaking News उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार व दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी (ता. २५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Big Breaking News)
अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Big Breaking News)
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो हा पुणे बाजूकडे निघाला होता. तर चारचाकी गाडी हि सोलापूरच्या निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. हा तसेच बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाला हि ठोकरले. (Big Breaking News)
अपघात एवढा भीषण होता कि टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ जखम झाली आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील हि व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. (Big Breaking News)
दरम्यान, सदर अपघातग्रस्तांना कस्तुरी प्रतिष्ठानच्या बापू गिरी, संतोष झोंबांडे, सुरेश वरपे, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, व लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत केली. जखमींवर उपचार सुरु असून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Big Breaking News)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..