Big Breaking News लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून झालेल्या इंधनचोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी व लोणी काळभोरचा इंधनमाफिया प्रविण मडखांबे याला आळंदी म्हातोबाची डोंगरातील इंधनचोरी प्रकरणात कंपनीतून ‘सहकार्य’ करणाऱ्या एचपी कंपनीतील सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटरसह दोघांना बुधवारी (ता.२) रात्री उशीरा अटक केली. (Big Breaking News)
संकेत अनिल शेंडगे (वय २९, रा. माऊली अपार्टमेंट, गुजरवस्ती, कवडीपाट टोनाक्याजवळ, कदमवाकवस्ती ता. हवेली) हे आळंदी म्हातोबाची डोंगरातील इंधनचोरी प्रकरणात कंपनीतून ‘सहकार्य’ करणाऱ्या एचपी कंपनीतील घरभेद्याचे नाव असून, पोलिसांनी इंधनमाफिया प्रविण मडखांबे याचा वाहनचालक राजू तानाजी फावडे (वय ३२, रा. अंबिका माता मंदिर, कदमवाकवस्ती ता. हवेली) यालाही बुधवारी अटक केली. (Big Breaking News)
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी व लोणी काळभोरचा इंधनमाफिया प्रविण मडीखांबेसह विशाल धानाजी धायगुडे (वय ३१), बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघेही सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना यापूर्वीच अटक केली. यामुळे याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर पोचली आहे. तर पोलिसांना इंधनचोरी प्रकरणात कंपनीतून ‘सहकार्य’ करणाऱ्या आणखी एका एचपी कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव समजले आहे. या संशयिताच्या मागावर पोलिस असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी दिली. (Big Breaking News)
जमिनीखालील पाईपलाईन फोडून इंधनचोरी
आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करणाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. यात पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी प्रविण मडीखांबे, विशाल धायगुडे व बाळू चौरे या तिघांना अटक केली होती. प्रविण मडखांबे अटक केली असली तरी, पोलिसांना या प्रकरणात इंधन चोरीसाठी कंपनीतूनच ‘सहकार्य’ झाल्याचा सुरुवातीपासुनच संशय होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरुवात केली असता, प्रविण मंडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांना जमिनीखालील पाईपलाईन फोडण्यापासून ते पाईपलाईनमधून इंधन चोरी करण्यापर्यंत एचपी कंपनीचा सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटर संकेत शेंडगे व त्याच्या एका सहकाऱ्याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. (Big Breaking News)
एकाला अटक तर साथीदार फरार
संकेत शेंडगे याला अटक झाली असली तरी त्याचा एक सहकारी मात्र फरार होण्यास यशस्वी ठरला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ते सातारा या दरम्यानच्या इंधनवाहू पाईपलाईनवर लक्ष ठेवणाऱ्या लोणी काळभोर येथील एचपी कंपनीच्या सेन्सर रुमवर संकेत संकेत शेंडगे हा असतो, याची माहिती प्रविणला मिळाली होती. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करण्याच्या कामात संकेतची मदत होऊ शकते हे लक्षात घेऊन प्रविणने संकेतला जाळ्यात ओढले होते. (Big Breaking News)
पाईपलाईनला छिद्र पाडण्यापासून ते चोरीपर्यंत सहभाग
संकेत शेंडगे आठवड्यातून दोन दिवस रात्रीच्या वेळी कामावर असल्याची संधी साधून प्रविण व त्याच्या सहकाऱ्यांनी पाईपलाईनला छिद्र पाडण्यापासून इंधन चोरी करण्यापर्यंतची कामे केल्याचे पोलिसी तपासात निष्पन्न झाले. हे काम मागील काही महिन्यांपासुन सुरु होते. प्रविण मडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने काम केले असले तरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सखोल तपासामुळे हा गुन्हा उघडकीस येऊ शकला. (Big Breaking News)
आणखी मासे जाळ्यात अडकणार का?
आळंदी म्हातोबाची इंधन चोरी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या प्रविण मंडखांबेवर इंधनचोरीचे तब्बल सातहुन अधिक गुन्हे दाखल आहेत. प्रविण हा चार महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. प्रविण हा इंधन चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्या असून, त्याचे अनेक साथीदार लोणी काळभोर व परिसरात मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत.
पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांची लोणी काळभोरला बदली झाल्यापासून प्रविण मडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंधन चोरी करण्यास सुरुवात केली होती. प्रविण मडखांबे याचे मागील सहा महिन्यातील कॉल डिटेल्स व संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. यातून इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.