Big Breaking News : पुणे : वानवडी येथील सोळंके ज्वेलर्सच्या दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१७) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हि आग विझविताना एक जवान गंभीर जखमी झाला आहे. तर या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले.
ज्वेलर्सच्या दुकानाला भीषण आग
निलेश वानखेडे असे जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. तर या आगीत शोकेसमध्ये ठेवलेल्या चांदीच्या मूर्ती वितळून त्यांचा गोळा झाला. तर लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले असल्याने ते मात्र वाचले. Big Breaking News
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत सोळंके ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. या दुकानाला सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून धूर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला खबर दिली. Big Breaking News
या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा अग्निशमन केंद्राचे अधिकारी कैलास शिंदे, तांडेल महादेव मांगडे, फायरमन सागर दळवी, निलेश वानखेडे, दिनेश डगळे, चालक सत्यम चौखंडे हे तातडीने घटनास्थळी झाखल झाले. त्यानंतर अग्निशमन जवानांनी शटर उचकटून पाण्याचा मारा सुरु केला. आणि काही वेळानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीच आग विझविताना निलेश वानखेडे हे जवान गंभीर जखमी झाले आहेत. Big Breaking News
दरम्यान, हि आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकानातील शोकेसमध्ये चांदीच्या मूर्ती व इतर वस्तू ठेवल्या होत्या. आगीत त्या वितळून त्यांचा गोळा झाला. तो ज्वेलर्सच्या मालकाकडे सोपविला आहे. लॉकरची व दुकानातील डायर्यांची माहिती अगोदर दिल्याने आगीपासून त्या वाचविण्यात यश आले. सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असल्याने ते वाचले आहे.