Bhosari | पुणे : खेळत असताना एका ९ वर्षाच्या चिमुकल्याच्या गुप्तांगात दोन अल्पवयीन मुलांनी काठी घातल्याचा धक्कादायक प्रकार भोसरी एमआयडीसी परिसरातील महात्माफुलेनगर येथील म्हसोबा मंदीराचे पाठीमागे शनिवारी (तां.. १३) सायंकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आला आहे. या घटनेत चिमुकल्याला मोठी दुखापत झाली आहे.
या प्रकरणी ९ वर्षाच्या मुलाच्या वडीलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ वर्षाचा चिमुकला महात्माफुलेनगर येथील म्हसोबा मंदीराचे पाठीमागील शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास परिसरात खेळत होता. यावेळी दोन अल्पवयीन मुलांनी चिमुकल्याच्या गुप्तांगात काठी घातली. या घटनेत चिमुकल्याला मोठी दुखापत झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी ९ वर्षाच्या मुलाच्या वडीलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात कलम ३७७, ३४ सह लैंगिक अपराधांपासुन बालकाचे संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ३ ( ब ), ४, ५ ( एम ) आणि ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.