Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नसरापूर बाजारपेठेत थरारक चोरी! ग्राहक बनून आलेल्या महिलांनी ‘पंडित ज्वेलर्स’मधून ८४ हजारांचे सोने लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 15:42

विशाल शिंदे
Bhor News भोर, ता. 18 : नसरापूर बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहक असल्याचे भासवत पाच महिलांनी आणि एका लहान मुलाने सोन्या-चांदीच्या दुकानात प्रवेश करून अत्यंत शिताफीने तब्बल ८४ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुख्य बाजारपेठेतील पंडित ज्वेलर्स येथे घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. Bhor News

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेत मोठी गर्दी असताना आरोपी महिलांनी चोरीचा डाव आखला. सुरुवातीला दोन महिला आणि एक लहान मुलगा दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. काही वेळाने आणखी तीन महिला दुकानात दाखल झाल्या. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेगवेगळ्या ग्राहकांकडे वळले.

दरम्यान, नथनी पाहण्याच्या बहाण्याने महिलांनी विविध डिझाईनचे पाऊच हातात घेतले. त्याच वेळी एका महिलेने अत्यंत चलाखीने नथनीचे पाऊच आपल्या साथीदार महिलेकडे आणि नंतर त्या मुलाच्या हातात दिले. काही क्षणांतच हा सर्व प्रकार घडला. दुकानातील कर्मचाऱ्यांना कोणताही संशय न येऊ देता सर्व आरोपी कोणतीही खरेदी न करता दुकानातून निघून गेले. Bhor News

 

सुरुवातीला दुकान मालकांना चोरी झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र काही दिवसांनी नथनीचे दोन पाऊच गायब असल्याचे पंडित ज्वेलर्सचे मालक विनय पंडित यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांनी आखलेल्या चोरीच्या कटाचा पर्दाफाश झाला. Bhor News

या चोरीत सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून, त्यांची किंमत ८४ हजार ६०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्हीत आरोपी महिलांची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. Bhor News

दरम्यान, नसरापूर परिसरात मागील काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी आणि अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार व्यापारी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. “राजगड पोलीस स्टेशन नसरापूरमधून हलवल्यानंतर पोलिसांची गस्त कमी झाली असून, त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

यापूर्वी मेडिकल दुकाने फोडणे, घरफोडी तसेच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमुळे परिसरात आधीच भीतीचे वातावरण आहे. आता भर बाजारपेठेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नसरापूर बाजारपेठेत पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, चोरी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि राजगड पोलीस स्टेशन पुन्हा नसरापूर परिसरात सुरू करावे, अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. Bhor News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37
Next Post

Fursungi Crime News : होळकरवाडीत 'निर्भया'वर अत्याचार करून हैद्राबादमध्ये लपलेला नराधम मावसभाऊ जेरबंद ; वेशांतर करून गॅरेजमध्ये लपलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.