(Bhigwan News) भिगवण : मदनवाडी चौफुला येथे पुणे -सोलापूर महामार्गलगत सेवा रस्त्याच्या जवळ बांधण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली आहेत. त्यामुळे या झाकणांची वेळीच दुरुस्ती केली नाही, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ झाकणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू असते. अचानक वाहनचालक अथवा पादचारी यामध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यबाबत पाटस टोलनाक्याचे महामार्ग देखभालीचे प्रमुख सुरजित सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, नवीन झाकणे टाकण्यासाठी उपलब्ध नाहीत. ज्यावेळी झाकणे उपलब्ध होतील त्यावेळी टाकून देऊ,. अशी उडवाउडवीची उत्तर त्यांनी दिली.
आता झाकणांसाठी किती काळ लागेल ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन झटपट पावले उचलणार आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
मदनवाडी गावचे रहिवासी असणारे रोहित बंडगर म्हणाले…!
“ड्रेनेज लाईनवरीन झाकण तुटल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. रात्रीचा अंदाज न आल्याने एकदोन दुचाकी चालक यात पडले आहे. वेळेत याची दुरुस्त केली नाही तर गांधीमार्गाने याचे उत्तर टोल प्रशासन व रस्ते प्रशासनाला दिले जाईल.