सागर जगदाळे : भिगवण
Bhigvan News : भिगवण, (पुणे) : मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. ०६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Bhigavan News)
वैशाली कल्याण काळे ( वय – ४०, रा. मदनवाडीची भकासवाडी ता. इंदापुर) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची बहिण शालन प्रताप काळे (वय – ४३, व्यवसाय- घरकाम रा. मदनवाडीची भकासवाडी, ता.
इंदापुर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Bhigavan News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०५) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैशाली काळे हि जेवण घेऊन येते असे म्हणून घराबाहेर गेली होती. टी रात्री खूप उशीर झाला तरीही परत आली नाही. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा शोध घेतला असता मदनवाडी गावचे हद्दीत व्यंकटेश लॉन्सचे समोरील विटभट्टीचे बाजुला एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला. (Bhigavan News)
दरम्यान, सदर मृतदेहाची पाहणी केली असता सदराचा मृतदेह हा वैशाली हिचा असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय भिगवण येथे पाठविला असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. (Bhigavan News) हा घातपात आहे की इतर काही याबाबतचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक धडस पाटील हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Bhigwan News : भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के