सागर जगदाळे
(Bhigwan News) भिगवण (पुणे): भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखत पोलिस नेहमी कामात व्यस्त असतात. हरवलेले मोबाईल परत मिळतीलच यावर नागरिकांना विश्वास नाही. मात्र भिगवण पोलिसांनी तब्बल ३२ हरवलेले मोबाईल व एक मोटार सायकल असा ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे. यामुळे नागरिकांचा पोलिसांच्या विषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीसांविषयी समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे उददेशाने हरवलेले व चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषनाचे आधारावर शोधुन ते संबंधीत तकारदार यांना परत दयावेत अशा सुचना पोलिसांना दिल्या होत्या.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने, यांना सदरचे मोबाईलचा व मोटार सायकलींचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होता.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषन व सायबर सेलच्या मदतीने गोवा, गुजरात, कर्नाटक, तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, कोल्हापुर, सातारा, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अशा जिल्हातुन ॲपल, ओपो, व्हिओ, वन प्लस, सॅमसंग, एम.आय, आय टेल, अशा विविध कंपनीचे एकुण ३२ मोबाईल व एक मोटारसायकल असा ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नागरीकांना परत केलेला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनासामांन्याचे मनामध्ये पोलीसांचे बाबत आदर निर्माण होवुन आत्मविश्वास वाढला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने, यांनी केली आहे.